रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत पंखाप्रमाणे हवेत हात हलवून नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. 'गडयांनो.. पतंग उडवूं चला' म्हणत आकाशात उडवलेले रंगी-बेरंगी पतंग; 'बहु असोत सुंदर संपन्न.. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण शालेय अभ्यासक्रमातल्या काही कविता मात्र आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून कुठेतरी खोलवर आपल्या मनात त्या घर करून बसलेल्या असतात.

शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हेच कळत नाही. आपण त्यांना 'लढ म्हणा...' नाहीच केवळ 'ओळखलंत का सर मला....' इतकेच विचारू शकतो. साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यानी अभ्यासलेल्या अशा काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व जुन्या कविंना हा मानाचा मुजरा...!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुचना:

ह्या ब्लॉगवरील प्रकाशित कविता बालभारती/कुमारभारती पाठ्यपुस्तकातील असून, मी त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर करत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमातून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क बालभारती/कुमारभारती/युवकभारती, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून केवळ रसिक-वाचक, अभ्यासक यांना मराठी अभ्यासक्रमातील कविता एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे. येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास त्या काढून टाकल्या जातील. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. एखादी कविता किंवा काही माहिती हवी असल्यास कॉपी पेस्ट न करता त्याच्या लिंकचा उपयोग करा किंवा तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवे असलेले साहित्य आम्ही तुम्हाला जरुर मेल करू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

स्वागत आहे !

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

Monday, January 16, 2012

डोंगरी शेत

डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती?
आलं वरीस राबून मी मरावं किती?

कवळाचे भारे बाई गं घेऊन चढावं किती?
आडाचं पाणी बाई गं पाणी वढावं किती?
घरात तान्हा माझा गं तान्हा रडंल किती?
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?

आलं आलं वरीस जमिन नांगरुन
उभं पीक नाचे सोन्यानं फुलून
पर एक मेला सावकार ठोला
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
असं उपाशी राहून गं आम्ही मरावं किती?

म्हागाइनं बाई घातला हैदोस
गळा आवळी बाई सावकारी फास
कुनाचे देऊ आन कुनाचं ठेवू
अशीच वर्सावर वर्स जातील किती?

या संसारा बाई सांजी येईना
रक्त गाळून अंगा धडूत मिळंना
कष्टाचं फळ बाई पदरांत पडंना
टीचभर पोटाला, हातभर देहाला जपावं किती?

अक्षय र्‍हाया कुंकू कपाळा
संसार वेलीच्या फुलवाया फुला
रुप नवं आणू माय धरतीला
तोडू जुलमाचे काच, हे रावणी फास
एकीचं निशाण हाती.


कवी : नारायण सुर्वे

2 comments:

Vishal Mulherkar said...

सर,
"कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतानो थोडासा गुन्हा करणार आहे" हि नारायण सुर्वेंची कविता पोस्ट करा.

Suresh Shirodkar said...

"कामगार आहे मी...." ही नारायण सुर्वेंची कविता माझ्याकडे आहे पण ती बालभारतीत होती कि नाही हे माहित नसल्यामुळे पोस्ट केलेली नाही.